Developer: Techedu
Category: Education
MPSC/ UPSC सारख्या व इतर स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत MSCE Pune इयत्ता ५ वी साठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इ. ८ वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन केले जाते. अशा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी इयत्ता ५ वी साठी हर अॅप बनविले असून यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता, यांचा सर्व उपघटकानुसार प्रश्नांची आंतरक्रियात्मक ३००० + प्रश्नमालिकेचा खजिना दिला असून यामध्ये सराव प्रश्नपत्रिकाही दिल्या आहेत.... विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्नप्रकार समजून घेण्यास मदत होणार आहे. अक्षरांचा टाइप विद्यार्थ्यांच्या वयाशी साजेसा ठेवलेला आहे. आवश्यकतेनुसार प्रश्नरचना चित्ररूप करण्यात आलेली आहे. तसेच गरजेनुसार उत्तराचे स्पष्टीकरणही दिले असल्यामुळे अंतिम परीक्षेची तयारी होण्यासाठी या अॅपचा निश्चितच उपयोग होईल. अॅपची वैशिष्ट्ये • शैक्षणिक सिद्धांतावर आधारित रचना • उत्तराचे स्पष्टीकरण पाहण्याची सोय • सरावाच्या शेवटी निकाल पाहता येतो व शेअर करता येतो • भरपूर प्रश्न संख्या • सर्व उपघटकांचा समावेश • ऑफलाईनही चालणार • कमी साईझ मध्ये • नवीन घटक आल्यावर नोटीफिकेशन मिळणार • सतत अपडेट मिळणार • किती प्रश्नसंच सोडविले याची माहिती दिसणार • प्रश्न सोडविण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला असून कमी वेळेत सोडविल्यामुळे परीक्षेसाठी निश्चित फायदा • प्रश्न अपडेट करण्यासाठी प्रत्येकवेळी अॅप अॅपडेट करण्याची गरज नाही अमोल हंकारे (Amol Hankare)